वळीवंडे शाळेच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 03, 2024 13:06 PM
views 383  views

देवगड : देवगड वळीवंडे येथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा वळीवंडे नं.१ च्याविद्यार्थ्यांनी रंगोत्सव या आंतराष्ट्रीय स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळविले असून त्याची दखल अंतराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे.

या स्पर्धेत मध्ये मिळवलेली पारितोषिके अनुक्रमे 

2 spectacular performance award आणि 7 मेडल्स मुलांना मिळाली तसेच रंगोत्सव राष्ट्रीय 2023-24 मध्ये तर १ कला मोरीट ट्रॉफी, 18 गोल्ड मेडल5 ब्राँझ मेडल 2 सरप्राईज गिफ्ट इत्यादी पारितोषिके मिळाली आहेत तर त्यामध्ये 23 विद्यार्थ्यांची या वेळी इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.STS स्पर्धेत 1 सिल्वरमेडल 2 ब्रांझ मॅडम तर अध्ययन संस्था आयोजित मापन २ ऑलम्पिक स्पर्धेत प्रथम क्रमांक त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित कला क्रीडा व ज्ञानी मी होणार या  स्पर्धेत देखील विविध क्रीडा प्रकारात घवघवीत यश मिळाले आहे.

त्याचबरोबर शाळेसाठी Best performing school in the world award मिळाला आहे. आणि Icon Award मिळाले आहेत.

तसेच मुख्याध्यापक मालंडकर मॅडम यांना Leader of excellence in cultural activities Award मिळाला आहे.या वेळी सहा. शिक्षक कोळी सर यांना कलाभूषण अवार्ड मिळाला आहे.या वेळी विध्यर्थी सर्व शिक्ष्यक शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका श्रीम. रश्मीगंधा मालंडकर, सहकारी शिक्षक श्रीम. मयूरी सैतवडेकर, श्रीम. संगीता वाघमारेश्री,.चिदानंद कोळी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षश्री. विरेंद्र सावंत य वेळी उपस्थित होते.