
सावंतवाडी : १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे सर्वत्र साजरा होताना दिसत आहे. प्रेमाच प्रतिक असणारा लाल रंग या दिवसाचं विशेष. पण, सिनेस्टाईल प्रपोज करायला गेलेल्या आशिकाला 'गाल लाल' करून परताव लागलं. तालुक्यातील बांदा येथे ही घटना घडली.
व्हॅलेंटाईन डे ला सिनेस्टाईल प्रपोज करायला तरूण गेला. तू मेरी धडकन, तू मेरी जान है, तेरे बिना अधूरी मेरी पहचान है... तेरे वजहसे गाल भी लाल है...! असं म्हणायची नामुष्की त्या आशिकावर आली. त्याच घडलं असं की, १४ फेब्रुवारीच औचित्य साधून तरुणीला हटके स्टाईलमध्ये प्रपोज करण्यास परप्रांतीय तरूण गेला. मुंबई गोवा महामार्गवरून ही तरुणी चालत जात होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या परप्रांतीय तरुणाने तिला 'प्रपोज' केल. अगदी हटके स्टाईलमध्ये प्रेमाची मागणी घातली. हा प्रकार पाहुन संतापलेल्या तरुणीन थेट त्या तरुणाच्या श्रीमुखात भडकवली. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे ला प्रपोज करण्यासाठी गेलेल्या या तरूणाच्या गालावरची लाली अजूनच लाल झाली. प्रपोजच उत्तर थप्पड से मिळाल्याने खजिल झालेल्या तरूणानं तेथून पोबारा केला. व्हॅलेंटाईन डे सुरू होण्यापूर्वीच त्याच्या वन साईड लव्ह स्टोरीचा धी एंड झाला.