वालावलकर रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग सोलर ऊर्जेने प्रकाशित

Edited by: मनोज पवार
Published on: December 17, 2024 13:51 PM
views 227  views

चिपळूूण :  प्रदूषणमुक्त हरित संकुलाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत वालावलकर हॉस्पिटलच्या बाह्य रुग्ण इमारतीला सौर पॅनेल बसविण्याचा सोहळा १२ डिसेंबर २०२४ रोजी साजरा करण्यात आला.

सूर्य प्रकाश पासून सौर मुबलक ऊर्जा निर्माण होते आणि अशी ऊर्जा ही अत्यंत नैसर्गिक,स्वच्छ,असून त्यापासून होणार कार्बन उत्सर्जननी वायू प्रदूषण  सौर ऊर्जा सूर्यापासून स्वच्छ, नूतनीकरणक्षम ऊर्जा तयार करते, म्हणून ती मुक्त, मुबलक आहे आणि विशेष म्हणजे ही ऊर्जा तयार होताना कोणतेही कार्बन उत्सर्जन किंवा स्थानिक वायू प्रदूषण निर्माण होत नाही. पवन आणि जलविद्युत यासारख्या इतर अक्षय ऊर्जा स्त्रोतांकरता फार खर्चिक यंत्रणा असणे आवश्यक आहे पण त्या पेक्षा  सौर ऊर्जा हा उत्तम पर्याय आहे कारण त्याकरता केवळ इमारतीच्या  छतावर किंवा खासगी मालमत्तेत देखील सौर पॅनेल्स बसवून ऊर्जा निर्माण करता येते. पृथ्वीवर चमकणारी सूर्याची सर्व ऊर्जा आपण केवळ एका तासासाठी टिपू शकलो, तरी देखील प्रचंड ऊर्जा निर्माण होऊ शकते. 

हे  लक्षात घेऊनच  विठ्ठलराव जोशी चॅरीटीएस ट्रस्टने पुढाकार घेऊन वालावलकर रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग आता सौर ऊर्जेने प्रकाशित केला आहे. ज्यामुळे ह्या विभागातील सी टी स्कॅन एम आर आय स्कॅन रेडिएशन युनिट्स सर्वे बाह्य रुग्ण ओ .पी. डी पारक्षण्याचे काम सुलभ होणार आहे. संस्थेचा सामाजिक कार्याचा उद्देश जाणून डोनर कंपनी लेग्रांड इंडिया लिमिटेड या कंपनीने पुढाकार घेऊन जवळ जवळ १०० किलो वॅट एव्हढी ऊर्जा निर्माण होईल अशी सौर पॅनेल्स देणगी दाखल स्थापित केली आहेत. 

अवेस्ता सोलरचे मालक (बर्गिस बलसारा) यांच्या यांच्या संपूर्ण सहकार्याने ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. संस्थेच्यावतीने संस्था चालक विकास वालावलकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आणि सौर ऊर्जेचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर कोकणात प्रथमच सुरु होत असून हे एक स्वस्त, कधीही ना संपणारी ऊर्जा निर्माण करण्याचे प्रयन्त होत आहे हे अधोरेखित केले गेले.