
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा आणि सावंतवाडी तालुका वैश्य समाज यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या १२ फेब्रुवारी रोजी सावंतवाडीत गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या ३ राज्यातील वधूवरांसाठी वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचा समाजाच्यावतीनं सत्कार करण्यात येणार आहे अशी माहीती वैश्य समाजाचे जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे, स्वागत समितीचे अध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर यांनी दिली.
दरम्यान भविष्यात शहरातील वैश्य भवनच्या इमारतीवर वसतिगृह बांधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या तसेच अन्य हालचाली आम्ही सुरू केल्या आहेत असं ते म्हणाले.
वैश्य समाज सावंतवाडी मंडळ यावर्षी शतक महोत्सव साजरा करीत आहे. या पार्श्वभूमीवर तीन राज्यांचा वधूवर मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. जास्तीत-जास्त लोकांची स्थळे जुळावीत यासाठी आवश्यक असलेले नियोजन करण्यात आले आहे असं मत अँड. दिलीप नार्वेकर यांनी व्यक्त केल.
या मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, अध्यक्षस्थानी माजी आमदार राजन तेली उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहूणे म्हणून कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, वैश्य समाज पतसंस्थेचे चेअरमन दिलीप पारकर, उद्योजक शालीग्राम खातू, अखिल गोमंतक वैश्य परिषदेचे अध्यक्ष सुब्राय शेठ उर्फ सुभाष मसुरकर, बेळगाव वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष दत्ता कनबर्गी आदी उपस्थित राहणार आहेत. समाज बांधवांचे प्रबोधन होत असताना उद्योग व्यवसायाचे नव्या दिशेने दर्शन व्हावे आणि त्याच्यासोबत परस्पर परिचयातून कुटुंब व्यवस्था सशक्त होऊन समाज संघटना बळकट व्हावी या हेतूने हा मेळावा आयोजित करण्यात आला असे रमेश बोंद्रे म्हणाले. तरी या मेळाव्यात जास्तीत-जास्त समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.
यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष रमेश बोंद्रे, अँड.पुष्पलता कोरगावकर, बाळासाहेब बोर्डेकर,समिर वंजारी,गितेश पोकळे,प्रतिक बांदेकर,कपिल पोकळे आदी वैश्यबांधव उपस्थित होते.