
कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राकेश राणे यांचा पराभव करत १० मते घेऊन सुशांत श्रीधर नाईक हे विजयी झाले.त्याबद्दल माजी आमदार वैभव नाईक,कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, यांनी सुशांत नाईक यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, जयेश धुमाळे, सुमेधा अंधारी, दीपिका जाधव, जाई मुरकर, लुकेश कांबळे, बाळू पारकर, अनिल डेगवेकर, बंडू ठाकूर, सचिन सावंत, महेश देसाई, अवधूत मालणकर, विलास कोरगावकर, अनंत पिळणकर, प्रथमेश तेली, सौरभ पारकर, हर्षद गावडे, संजय पारकर, उमेश वाळके, तेजस राणे, सुनील पारकर, संतोष पुजारे, वैभव मालंडकर, उत्तम लोके, धिरज मेस्त्री, चंद्रहास राणे आदि उपस्थित होते.










