वायरी भुतनाथ माजी उपसरपंच श्याम झाड भाजपात !

वायरीत ठाकरे गटाला धक्का
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 01, 2024 10:18 AM
views 280  views

मालवण : वायरी भुतनाथ ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा रामेश्वर मच्छिमार सोसायटी माजी उपाध्यक्ष, माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्याम झाड यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत सहकारी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृवावर विश्वास ठेवत गावच्या अधिकाधिक विकासासाठी प्रयत्नशील राहात भाजपात प्रवेश केल्याचे शाम झाड यांनी सांगितले. 


यावेळी भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत, भाजपा जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्षा अशोक तोडणकर, आनंद गांवकर, मच्छिमार सेल जिल्हा संयोजक विकी तोरसकर, उद्योजक मिलिंद झाड, युवा उद्योजक केदार झाड, ग्रापं सदस्य पांडुरंग मायानक, प्रतीक्षा केळूसकर, देवानंद लोकेगावकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, अरुण तळगांवकर, गणेश सातार्डेकर, मकरंद चोपडेकर, संदेश तळगांवकर, चंदन नाईक, बाबल गोसावी, हर्षद हळदणकर, बबन गांवकर, काना माडये, दादा वेंगुर्लेकर, हर्षद हळदणकर, बबन गांवकर, टेंबूलकर, जिवन मसुरकर, भाई मांजरेकर, अरुण तोडणकर, नितीन तोडणकर, विकी लोकेगावकर, भाऊ मोर्जे यांसह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.