'वैनतेय'कार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार विनायक गांवस यांना प्रदान

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले पुरस्कार वितरण
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: March 26, 2023 16:25 PM
views 395  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा 'पुरस्कार वितरण सोहळा' रविवार कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या सभागृहात पार पडला. 'वैनतेय'कार मे.द.शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार कोकणसाद LIVE व कोकणसादचे प्रतिनिधी विनायक गांवस यांना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. 

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा 'पुरस्कार वितरण सोहळा' कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सभागृहात पार पडला. यावेळी पत्रकार संघातर्फे जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पत्रकारितेत २५ वर्षे व त्याहून अधिक वर्षे करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. 'वैनतेय'कार मे.द.शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार विनायक गांवस यांना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

तालुका पत्रकार संघाचे शिरोडकर कुटुंबीय पुरस्कृत वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार विनायक गांवस, मठकर कुटुंबीय पुरस्कृत माजी आमदार तथा जेष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार अभिमन्यू लोंढे, अॅड. अनिल निरवडेकर पुरस्कृत कै. चंदू वाडीकर, आदर्श समाजसेवक पुरस्कार लुमा जाधव, डॉ. अजय स्वार पुरस्कृत जीवनगौरव पुरस्कार रमेश बोंद्रे, हर्षवर्धन धारणकर पुरस्कृत स्व. त्रि. अ. उर्फ बाप्पा धारणकर अष्टपैलू स्मृती पुरस्कार परशुराम मांजरेकर यांना तर अनिल भिसे कुटंबीय पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार तथा छायाचित्रकार कै. मुरलीधर तथा बंडोपंत भिसे पुरस्कार गणेश हरमलकर यांना प्रदान करण्यात आला.


यावेळी गोव्याचे आमदार जीत आरोलकर, मुंबई महानगरपालिका माजी नगरसेवक शैलेश परब, युवा उद्योजक विशाल परब, कोकणसाद मुख्य संपादक सागर चव्हाण, ब्युरो चीफ संदीप देसाई, तरूण भारत सिंधुदुर्ग आवृत्ती संपादक शेखर सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर, मराठी पत्रकार परिषद माजी अध्यक्ष गजानन नाईक, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, वैनतेयकार मे. द. शिरोडकर यांच्या कन्या उमा नीळकंठ मुंढेकर, जावई नीळकंठ मुंढेकर, नातू डॉ. अजेय मुंढेकर,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, निवड समिती सदस्य हरिश्चंद्र पवार, अवधुत पोईपकर, मोहन जाधव, सचिन रेडकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण मांजरेकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सचिव प्रसन्न राणे व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ सदस्य, पत्रकार उपस्थित होते.