भाजप मार्फत वैकुंठ रथाचं लोकार्पण !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: February 20, 2024 15:06 PM
views 90  views

मालवण : भारतीय जनता पार्टी मार्फत माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या श्री समर्थ मौनीनाथ एज्युकेशन कल्चरल ट्रस्टमार्फत नागरिकांच्या सेवेत वैकुंठ रथ देण्यात आला आहे. या वैकुंठ रथाचा लोकार्पण सोहळा मामा वरेरकर नाट्यगृहाच्या परिसरात भाजपचे मालवण कुडाळ विधानसभा संयोजक, माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत खरेदी विक्री संघाचे संचालक आबा हडकर यांच्या हस्ते संपन्न झाला.


यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, अशोक तोडणकर, विलास हडकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, चिटणीस निशय पालेकर, नारायण लुडबे, महेश मांजरेकर, भाऊ सामंत, बबन परुळेकर, विक्रांत नाईक यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.