
वैभववाडी : नाधवडे येथील यशोदा शंकर कांबळी (वय ८७) यांचे आज(ता.३१) वृद्धापकाळाने निधन झाले. त्या स्वर्गीय स्वातंत्र्यसैनिक शंकर कांबळी यांच्या पत्नी होत. शंकर कांबळी यांनी आझाद हिंद सेनेत सेवा बजावली होती. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी यशोदा कांबळी यांनी समर्थपणे सांभाळली होती .आज सकाळी राहत्या घरी त्यांच निधन झाले.त्यांच्या पश्चात चार मुलगे, तीन मुली, सुना, जावई, पुतणे असा मोठा परिवार आहे.त्यांच्यावर आज रात्री नाधवडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.










