'पत्रकार पुरस्कार' प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 31, 2026 16:44 PM
views 19  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, उपक्रम आणि जनहिताच्या कार्यक्रमांचा प्रभावी व उत्कृष्ट प्रसार आणि प्रचार करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. इच्छुक पत्रकारांनी आपले प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या नावे सादर करावेत. यासाठीची अंतिम मुदत पूर्वी २३ मार्च २०२६ होती; मात्र आता १५ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी आपले प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळकृष्ण परब यांनी केले आहे. 

प्रस्ताव सादर करताना १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत केलेल्या लिखाणाचा समावेश असणे आवश्यक असून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत.  तसेच संबंधित कालावधीत प्रकाशित झालेल्या बातम्या, लेख यांची प्रत प्रस्तावासोबत जोडणे बंधनकारक आहे.

जिल्ह्यातील शासकीय योजनांचा प्रभावी प्रचार-प्रसार करून जनतेपर्यंत माहिती पोहोचविणाऱ्या पत्रकारांना या उपक्रमातून सन्मानित करण्यात येणार असल्याने पत्रकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.