आनंदोत्सव २०२६ साठी नोंदणी सुरू ; चौथ्यावर्षी अधिक भव्य आयोजन

विविध स्पर्धा व आकर्षक बक्षिसांची मेजवानी
Edited by: विनायाक गांवस
Published on: March 31, 2026 17:01 PM
views 39  views

सावंतवाडी : आनंदोत्सव २०२६ निमित्त सावंतवाडीत २४, २५ आणि २६ एप्रिल २०२६ दरम्यान विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून स्टॉल बुकिंगला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. स्थानिक उद्योजक, कलाकार आणि व्यवसायिकांसाठी ही उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. या उत्सवामध्ये विशेष आकर्षण म्हणून रील मेकिंग स्पर्धा दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत विजेत्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांक : ₹१०,०००, द्वितीय क्रमांक : ₹५,०००, तृतीय क्रमांक : ₹३,००० अशी आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.तसेच पाककला (आंबा स्पेशल) स्पर्धा दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी होणार असून, विजेत्यांसाठी प्रथम क्रमांक : सिंगल गॅस शेगडी, द्वितीय क्रमांक : पुरी यंत्र, तृतीय क्रमांक : पुरी प्रेस मशीन अशी उपयुक्त बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय, उत्सवातील आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे दररोजचा लकी ड्रॉ, ज्यामध्ये फक्त ₹९९९ च्या खरेदीवर सहभागी होता येणार असून, दररोज विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे. उत्सवाचे आयोजन पौर्णिमा रविकांत सावंत यांच्यावतीने करण्यात येत असून सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आर. पी. डी. हायस्कूल, सावंतवाडी येथे सायंकाळी ४.०० ते रात्री १०.०० वा हा आनंदोत्सव होणार असून अधिक माहितीसाठी 9067927762 / 7249777679 या नंबरवर संपर्क साधावा. आनंदोत्सव २०२६ हा २४ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान रंगणार असून, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि मनोरंजनाचा संगम ठरणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.