
वैभववाडी : हेत रामवाडी येथील श्रीराम मंदिराच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच श्रीराम नवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले. श्रीराम कला, क्रीडा मंडळ व ग्रामस्थ रामवाडी यांच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.२५ ते २७ मार्च या कालावधीत हा उत्सव साजरा केला जाणार आहे. उत्सवाची सुरुवात २५ मार्चला श्रीराम मूर्ती अभिषेक व पूजेनं होणार आहे. त्यानंतर सत्यनारायण महापूजा, महाआरती व प्रसाद वाटप होईल. संध्याकाळी सामुदायिक हरिपाठ आणि वारकरी संप्रदायाचा भजन मेळा रंगणार आहे.दुस-या दिवशी
श्री देवता पूजन, श्रीराम जन्मोत्सव कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली असून ह.भ.प. पंढरीनाथ सावंत महाराज यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी श्रीराम जन्मोत्सव सोहळा, महाआरती व महाप्रसाद होईल. तसेच महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, श्रीराम पालखी मिरवणूक आणि संध्याकाळी आरती व स्तोत्रपठण होणार आहे. रात्री गुणवंत विद्यार्थ्यांचा व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येईल. त्यानंतर भव्य दिंडी भजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.शेवटच्या दिवशी ( २७ मार्च ) सायंकाळी ४ वाजल्यापासून नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या उत्सवासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.










