
देवगड : वाडा येथील उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांचा नुकताच पक्षप्रवेश भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी पडेल मंडळ अध्यक्ष बंड्यानारकर, देवगड मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ, जि.प. गटनेते संजय बोंबडी, पंचायत समिती सदस्य रवींद्र तिरलोटकर,अंकुश ठूकरुल, संजना आळवे, देवगड-जामसांडे शहराध्यक्ष वैभव कळंगुटकर, मकरंद जोशी, रामकृष्ण जुवाटकर, जि.प. सदस्य अवनी तेली, शशांक तावडे, सुहास वाडेकर, आशिष जाधव यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी देवगड तालुक्यातील वाडा गावातील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशामध्ये उबाठाचे उपविभाग प्रमुख संजय तावडे, शाखाप्रमुख रवींद्र मांजरेकर, बुथ प्रमुख संदेश जाधव तसेच वाडाग्रामपंचायतीच्या सदस्य अंकिता वाडेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी यावेळी पक्ष प्रवेश केला यावेळी विजय कारेकर, हेमंत पांचाळ, विद्या वाडेकर, विठ्ठलवाडेकर, संतोष जाधव, संतोष मिस्त्री, राजेंद्र वाडेकर, सत्यवान वाडेकर, कांता राहुल, भाग्यश्री वाडेकर, प्रवीण कानडे, धीरज मिस्त्री, सुशांत पांचाळ, विद्याधर पांचाळ, वैशाली वाडेकर आणि राजश्री मांजरेकर यांनी प्रवेश केला.










