देवगडमध्ये ठिकठिकाणी पोलिसांकडून वाहनचालकांची चौकशी

Edited by: संदीप देसाई
Published on: March 22, 2026 19:56 PM
views 156  views

देवगड : देवगड हापूस आंबा नुकसान भरपाई मिळावी यासाठी उद्या मुंबई गोवा महामार्गावर चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च रोजी मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे आंबा बागायतदार काजू बागायतदार संघाच्या वतीनेरास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देवगड शहर व आजूबाजूच्या परिसरात देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून या मार्गावरून जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची तपासणी व अन्य माहिती घेतली जात असून देवगडच्या परिसरात देवगड पोलिस स्थानकाच्या वतीने कडेकड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र महाडिक, गणपती गावडे, प्रभारी होमगार्ड समादेशक प्रसाद कदम,होमगार्ड सुधाकर नाईकधुरे,प्रदीप राणे, श्रीराम साईंम,दत्ताराम झाजम कासम झारी आदी यावेळी यावेळी सर्व वाहनचालकांची कसून चौकशी करत असल्याचं पहायला मिळाले.