
वैभववाडी : बौद्ध विकास मंडळ मुंबई (रजि.), ग्रामीण मंडळ, माता रमाई महिला मंडळ वेंगसर व सम्यक युवा कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित कोळपे जि.प. सदस्य प्रमोद रावराणे व तिथवली पं.स. सदस्या सुवर्णा संसारे यांचा सत्कार करण्यात आला. पंचशील नगर समाज मंदिरात हा समारंभ पार पडला.
नुकत्याच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या.या निवडणुकीत विजयी झालेल्या श्री रावराणे व सौ.संसारे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित दोन्ही सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.यावेळी माजी जि.प.सभापती शारदा कांबळे,अभय कांबळे, गोविंद कांबळे, साक्षी कांबळे, गुणाजी पांडुरंग कांबळे, सुनील कांबळे, उमाजी जाधव, संदेश कांबळे, समाधान गुरव, विलास पावसकर, संदीप नार्वेकर, अतुल सरवटे, आत्माराम गोठणकर, रमेश बंदरकर, सुभाष घाडी, आनंद शिंदे, महेंद्र रांबाडे, मनोहर फोंडके, महेश संसारे तसेच सुनयना कोटकर, स्नेहलता जाधव, सुमन कोटकर, सौ. पुनम कांबळे, सुनिता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्कार प्रसंगी बोलताना श्री रावराणे म्हणाले,आपण केलेला सत्कार नेहमीच स्मरणात राहील.आपल्या गावच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू असं आश्वासन दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुभाष कांबळे यांनी केले.










