वैभववाडीत पहील्या चार तासात २९.५६ टक्के मतदान

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 07, 2026 13:05 PM
views 42  views

वैभववाडी : तालुक्यात पहील्या चार तासात मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या सत्रात २९.५६ टक्के इतके मतदान झाले आहे. तालुक्याच्या एकुण मतदानापैकी ९४५६ जणांनी  मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये पुरुष ५०५१ तर महीला ४४०५ यांचा समावेश आहे. मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे.