कुडाळ तालुक्यात मतदानाचा आकडा घसरतोय

दुपारी १.३० वाजेपर्यंत ३७.७२ टक्के मतदान
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 07, 2026 14:37 PM
views 46  views

कुडाळ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून कुडाळ तालुक्यात मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दुपारी १.३० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार तालुक्यात सरासरी ३७.७२% मतदान झाले आहे. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा मंद असला तरी, १० वाजेनंतर मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे चित्र दिसले. विशेषतः ग्रामीण भागात महिला मतदारांची उपस्थिती वाढत आहे. मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे काहीसे चिन्ह दिसत आहे. दुपारच्या सत्रापर्यंत 50% पेक्षा जास्त आकडा ओलांडलेला असतो मात्र आताची आकडेवारी ही संतोष जनक नाल्याचे दिसत आहे.

मतदानाची सविस्तर आकडेवारी (दुपारी १.३० पर्यंत) :

स्त्री मतदार: २०,६८८

पुरुष मतदार: २३,३०६

एकूण मतदान: ४३,९९४

मतदान टक्केवारी: ३७.७२%

तालुक्यातील अनेक केंद्रांवर नवमतदार आणि वृद्धांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आतापर्यंत कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. सायंकाळच्या सत्रात मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.