मालवणात शांततेत मतदान सुरु

२ वाजेपर्यंत सरासरी ३६ टक्के मतदान
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: February 07, 2026 14:45 PM
views 46  views

मालवण : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मालवणात शांततेत मतदान सुरु आहे. दुपारी २ वाजेपर्यंत सरासरी ३६ टक्के मतदान झाले आहे. मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वायरी भूतनाथ येथील मतदान केंद्रावरील मशीनमध्ये बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया बंद झाली होती. मशीन बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु होती.