वैभववाडीत मतदानाला शांततेत प्रारंभ

पहील्या टप्यात ११.३९ टक्के मतदान
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 07, 2026 10:15 AM
views 81  views

वैभववाडी : वैभववाडीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानाला शांततेत प्रारंभ झाला आहे. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ११.३९% टक्के मतदान झाले. यामध्ये  ३१,९९१ मतदारांपैकी ३६४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये पुरुष - २४३१ महीला - १२१३ यांचा समावेश आहे. सकाळच्या सत्रात काही मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या.