देवगडमध्ये ११.३० पर्यंत २८.०२ टक्के मतदान

Edited by:
Published on: February 07, 2026 12:43 PM
views 50  views

देवगड : देवगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानाला सुरुवात झाली असून, देवगड तालुक्यामध्ये सकाळच्या 9.30 पर्यंत च्या सत्रात 6129 मतदान झाले असून त्यामध्ये पुरुष 4155, तर स्त्रिया 1974 यांनी मतदान केले आहे. एकूण 6129 मतदारांनी यावेळी मतदान केले आहे. तर 11.30 पर्यंत 8224, पुरुषांनी तर 6667 स्त्रियांनी मतदान केले असून एकूण 14891 मतदारांनी आतापर्यंत मतदान केले आहे. तर आतापर्यंत 28.02 टक्के मतदारांनी मतदान केले आहे.