जि. प. व पं. स. साठी मतदानाचा वेग मंदावला

पहिल्या सत्रात २५ % मतदान
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 07, 2026 12:05 PM
views 36  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे ९ गट आणि पंचायत समितीच्या १८ गणांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. प्रशासकीय सज्जतेत सुरू झालेल्या या प्रक्रियेत सकाळी ११:३० वाजेपर्यंत तालुक्यात २५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सकाळच्या सत्रात मतदारांचा उत्साह काहीसा कमी दिसला असला तरी, दुपारनंतर हा ओघ वाढण्याची शक्यता आहे.