
सिंधुदुर्गनगरी : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी १०.६४ टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यात एकूण ५,६१,१०५ मतदारांपैकी सकाळी ९.३० वाजेपर्यंत ५९,७२६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ३८,०५० पुरुष आणि २१,६७६ महिला मतदारांचा समावेश आहे.
तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.
देवगड : ११.५३ टक्के
वैभववाडी : ११.३९ टक्के
कणकवली : ११.१८ टक्के
सावंतवाडी : ११.११ टक्के
कुडाळ : १०.६७ टक्के
वेंगुर्ला : ९.९८ टक्के
दोोडामार्ग : ९.९४ टक्के
मालवण : ९.२९ टक्के
आतापर्यंत देवगड तालुक्यात सर्वाधिक तर मालवण तालुक्यात तुलनेने कमी मतदान झाल्याचे चित्र आहे. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग संथ असला तरी, पुढील तासांत मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा निवडणूक प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. मतदान केंद्रांवर शांततेत आणि सुरळीतपणे प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.










