
वैभववाडी : तालुक्यात ठाकरे शिवसेनेला धक्का बसला आहे.भुईबावडा पंचायत समितीतील ठाकरे शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी भाजपाचे उमेदवार देवानंद पालांडे यांना पाठिंबा दिला आहे. तालुक्यात ठाकरे शिवसेनेला हा चौथा मोठा धक्का या निवडणुकीत बसला आहे.
तालुक्यात ठाकरे शिवसेनेला निवडणुकीत एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत.सुरवातीला कोळपे जिल्हा परिषदेच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला.त्यानंतर डमी उमेदवाराने माघार घेतली होती.त्यामुळे कोळपे जिल्हा परिषद सदस्य पदी भाजपचे प्रमोद रावराणे बिनविरोध झाले होते.यानंतर भुईबावडा पंचायत समितीसाठी ठाकरे शिवसेना पुरस्कृत असलेले वसंत मोरे यांनी आज भाजपाच्या उमेदवार देवानंद पालांडे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आज रितसर भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपचे नासीर काझी, भालचंद्र साठे, किशोर कांबळे, स्वप्नील खानविलकर,मनोज परब, रविंद्र गुरव,विलास कदम,प्रताप पालांडे, पांडुरंग जाधव, धनाजी हडशी, प्रथमेश पालांडे, ओंकार पाटील,प्रसाद पालांडे, प्रथमेश देसाई आदी उपस्थित होते.










