९ तारीखला गुलाल महायुतीचाच : सोनल कुबल

Edited by: लवू परब
Published on: February 02, 2026 14:18 PM
views 58  views

दोडामार्ग : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला अवघे चार दिवस जरी शिल्लक असले तरी येणाऱ्या ९ तारीखला गुलाल महायुतीचाच उधळणार असल्याचा आशावाद पं . स उमेदवार सोनल कुबल यांनी व्यक्त केला. मणेरी जि. प. व पं. स. मतदार संघात प्रचार करताना संपूर्ण मतदार संघ आम्ही पिंजून काढला आहे. सर्व महिला युवा, जाणकारांचा मोठा प्रतिसाद आम्हला लाभत आहे. त्यामुळे महायुतीचा विजय निश्चित आहे. महायुतीच्या माध्यमातून मणेरी मतदार संघात प्रत्येक गावांत गावात अनेक विकास कामे पालकमंत्री नितेश राणे, प्रद्धेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून केला आहे. याचा फायदा या दोन्ही उमेदवारांना नक्कीच होईल अशी आशा प्रसाद कुदस्कर यांनी व्यक्त केली.