
कणकवली : कासार्डे जिल्हा परिषद मध्ये आम्ही घरोघरी फिरत असताना मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेवून माझा विजय होईल. या जिल्हा परिषद मधील नांदगाव व कासार्डे पंचायत समिती मधील घरोघरी प्रचाराची फेरी सुरु आहे. खा.नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे यामुळे मला लोकांचे आशीर्वाद मिळत आहेत. आता या नांदगाव प्रचार फेरी ला गर्दी पाहता विरोधी उमेदवाराचा दारुन पराभव होईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद उमेदवार संतोष पारकर यांनी व्यक्त केली. नांदगाव तिठा येथे कासार्डे जिल्हा परिषदचे भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार संतोष पारकर यांच्या प्रचारार्थ नांदगाव येथील प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी नांदगाव दशक्रोशीतील महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कासार्डे जि.प.महायुतीचे उमेदवार संतोष पारकर यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरीचा शुभारंभ असलदे येथील देवगड निपाणी मार्गावरील श्री देव कोळंबा देवाला श्रीफळ वाढवून गा-हाणे घालत करण्यात आला. यावेळी नितेश राणे तुम आगे बढो ... हम तुम्हारे साथ है... संतोष पारकर आगे बढो ... हम तुम्हारे साथ है ... भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
यावेळी माजी जि.प.सदस्य संजय देसाई , प्रकाश पारकर, पंढरी वायंगणकर ,नांदगाव बिनविरोध पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम , असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , नांदगाव सरपंच भाई मोरजकर, कासार्डे पं.स.उमेदवार अण्णा खाडये , माजी सरपंच सुरेश लोके,भालचंद्र साटम,समीर शेटये, रघुनाथ लोके , बाबू फाटक , उत्तम सावंत,संतोष वायंगणकर , पांडूरंग चव्हाण , कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, सुशील इंदप, चंदू शिंदे , सुभाष इंदप , आप्पा इंदप , माजी सरपंच श्री. पोकळे, दयानंद हडकर , उपसरपंच सचिन परब, प्रविण डगरे, प्रदिप हरमलकर, संतोष घाडी , संतोष परब , उदय परब , बाबू परब , सतीश पोकळे , कमलेश पाटील , मारुती मोर्ये , राजू खोत , राजू तांबे , आबा बिडये , इरफान साटविलकर , यासीन मास्के ,यासीन पाटणकर , हनुमंत वाळके, निरज मोर्ये , तोंडवली सरपंच मनाली गुरव , अशोक बोभाटे , श्री. शेटये , रवी बोभाटे, सुनील बोभाटे , विलास कांडर , दिनेश कांडर , गणेश पाताडे , महेश लोके, विजय आचरेकर , प्रशांत परब, मनोज लोके , संदेश आचरेकर, प्रकाश आचरेकर , बाबाजी शिंदे , सुभाष तांबे , आत्माराम घाडी , विजय खरात, रुपेश खरात, राजू राणे आदींसह नांदगाव दशक्रोशीतील महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.










