
वैभववाडी : लोरे नं २येथील श्री दत्तसेवा ग्रामस्थ मंडळ, मांजलकरवाडी यांच्या वतीने गुरुवार, दिनांक २९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा प्राथमिक विद्या मंदिर, मांजलकरवाडी शाळेच्या पटांगणावर होणार आहे.
या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकास ₹५००१/- व चषक, द्वितीय क्रमांकास ₹३००१/- व चषक, तृतीय क्रमांकास ₹२००१/-, तर चतुर्थ क्रमांकास ₹१००१/- असे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेची प्रवेश फी ₹३५०/- ठेवण्यात आली आहे.स्पर्धेच्या नियमांनुसार, ही स्पर्धा ६०० किलो वजन गटाची असून एका संघातील सर्व खेळाडूंचे एकूण वजन ६०० किलोच्या आत असणे आवश्यक आहे. एका संघात खेळलेला खेळाडू दुसऱ्या संघातून खेळू शकणार नाही. बदल फक्त दोन खेळाडूंनाच करता येईल. खेळादरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही. संघांनी आपली नावे २८ जानेवारीपर्यंत नोंदविणे आवश्यक आहे. पंचांचा व मंडळाचा निर्णय अंतिम राहील.स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी केदार नावळे , प्रतिक मोरे,घनश्याम नावळे व ओंकार मांजलकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.










