
कणकवली : मी स्वतःहून उमेदवारी मलाच द्या असं सांगितलं नव्हतं आरक्षण जाहीर झाल्यानंतर वरिष्ठना विचारूनच मी हरकुळ बुद्रुक मतदार संघात इच्छुक होतो. परंतु अचानक वरिष्ठांनी निर्णय बदलला आणि स्थानिक उमेदवार न देता बाहेरील उमेदवार दिला हे आपल्याला पटलं नाही असे संदेश उर्फ गोटया सावंत यांनी सांगितले. जि. प. निवडणूक जाहीर होताच अनेक इच्छुक तयार झाल्या नंतर हरकुळ बुद्रुक जि. प. मतदार संघाची उमेदवारी मनोज रावराणे यांना अखेरच्या क्षणी जाहीर झाल्यानंतर हरकूळ मतदार संघात कार्यकर्त्यांमध्ये मोठया प्रमाणात नाराजी निर्माण झाली. मतदार संघातील भाजप कार्यकर्ते व मतदार याची बैठक होऊन मतदारसंघा बाहेरील उमेदवार नको अशी सर्वांनीच मागणी केली. तसेच मतदार संघातील कार्यकर्ते यांनी संदेश उर्फ गोटया सावंत यांना उमेदवारी द्यावी अशी एकमुखी मागणीही पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली होती.
असं असून सुद्धा भाजप कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रा प सदस्य व इतर जेष्ठ कार्यकर्ते आजी माजी पदाधिकारी या सर्वांनीच मतदार संघा बाहेरील उमेदवार देण्यात आला. तो बदलून संदेश सावंत किंवा संजना सावंत यांना उमेदवारी मिळावी असा ठराव घेण्यात आला. यावेळी राजू पेडणेकर, बाबा वर्देकर, बुलंद पटेल, मंगेश बोभाटे, सपना मेस्त्री,रमेश सावंत, छोटू कदम, विद्याधर तांबे यांनी आपले विचार मांडून उमेदवार बदलण्याची मागणी केली.










