वेतोरेतील श्री देवी सातेरीचे दर्शन घेऊन आडेली मतदार संघात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ

Edited by: दिपेश परब
Published on: January 23, 2026 18:50 PM
views 39  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ वेतोरे गावची  ग्रामदेवता श्री देवी सातेरीचे दर्शन घेऊन करण्यात आला. आडेली जिल्हा परिषद सदस्य पदासाठी रिंगणात असलेले जिल्हा बँक अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी व वायंगणी पंचायत समिती सदस्य पदासाठी रिंगणात असलेल्या शीतल राऊत या महायुतीच्या उमेदवारांनी श्री देवी सातेरीचे आशीर्वाद घेऊन प्रचारास आज शुक्रवारी सायंकाळी सुरुवात केली. यावेळी सर्वांनी श्री देव वेतोबा चेही दर्शन घेतले.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, वेतोरे सरपंच प्राची नाईक,भाजपा तालुका उपाध्यक्ष दिपक नाईक, भाजपा जिल्हा निमंत्रित सदस्य साईप्रसाद नाईक, वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघांचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, दाभोली सरपंच उदय गोवेकर, श्रीकृष्ण बांदवलकर, वेतोरे उपसरपंच तुषार नाईक, ग्रा. पं. सदस्य नितीन गावडे, विरोचन धुरी, विनायक गावडे, संतोषी गावडे, संगीता नाईक, साक्षी राऊळ, विक्रांत सावंत, सुधीर गावडे, प्रशांत नाईक, सुजाता वालावलकर, भाजपा युवा पदाधिकारी सौरभ समीर नाईक, प्रशांत प्रभूखानोलकर, यतीन आवळेगावकर, विजय वालावलकर, संदीप नाईक, यशश्री नाईक, प्रकाश गावडे, योगेश नाईक, सीताबाई शिरोडकर, सिद्धेश राऊळ, सातेरी वाचनालयाचे उपाध्यक्ष राधाकृष्ण वेतोरकर आदीसह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी श्री देवी सातेरीच्या आशीर्वादाने तसेच येथील जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेच्या आशिर्वादामुळे व सहकार्याने महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास मनीष दळवी यांनी बोलताना व्यक्त केला. यावेळी वेतोरे ग्रामस्थांच्या वतीने मनीष दळवी यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.