नाधवडेत पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी बांधला बंधारा

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 02, 2026 12:02 PM
views 25  views

वैभववाडी : वैभववाडी पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाधवडे येथील नदीवर बंधारा बांधून जलसंधारणाचा स्तुत्य उपक्रम राबविला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीअंतर्गत सर्व कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी यांनी या कामात सक्रिय सहभाग घेतला.

पावसाळ्यात साठवलेले पाणी उन्हाळ्यातही उपलब्ध राहावे, भूजल पातळी वाढावी तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ व्हावा, या उद्देशाने हा बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमामुळे नाधवडे परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी नाधवडे गावाच्या सरपंच लीना पांचाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य  सुधीर नकाशे, उपसरपंच श्री. पावसकर यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जलसंधारणासारख्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली जात असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.