
सावंतवाडी : नगरपरिषदेच्या भर बाजारपेठ असणाऱ्या स्वच्छतागृहाचा पोलखोल नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केला. भर बाजारात असणाऱ्या प्रसाधनगृहा शेजारील दारूच्या बाटल्यांसह संडास केल्याचा धक्कादायक प्रकार त्यांनी उघडकीस आला. आरोग्य निरीक्षक विनोद सावंत यांना बोलावून घेत स्वच्छता गृहात चांगली सेवा देण्यासह असुविधांवर ताताडीने कार्यवाही करण्याच्या सुचना श्री. सुर्याजी यांनी केल्या.
नगरसेवक सुर्याजी म्हणाले, भर बाजारपेठेतच आरोग्याची दुर्दशा झाली आहे. अशाने शहरवासीयांचे आरोग्य कसे चांगले राहिल ? हा प्रश्न आहे. आरोग्य निरीक्षक विनोद सावंत यांच्या ही गंभीर बाब निदर्शनास आणून दिली असून तातडीने कार्यवाही करून घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत. विक्रेत्यांसह पर्यटक या प्रसाधनगृहाचा वापर करतात. त्यामुळे प्रसाधनगृहात स्वच्छतेसह चांगली सेवा देण्यात यावी. तसेच परिसरात लाईट बसवण्यासह बंद असलेले वॉशरूम वापरास आणण्यासाठी सुस्थितीत आणावे अशी मागणी केली. यावर तातडीने कार्यवाही होईल अशी ग्वाही नगरपरिषद अधिकारी विनोद सावंत यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ॲड. प्रथमेश प्रभू उपस्थित होते.










