
वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीतील विविध विषय समित्यांच्या सभापती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदांची निवड सोमवार, दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.याकरिता विशेष सभा नगरपंचायत कार्यालयात सकाळी ११ वा.आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या आदेशानुसार ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे.नगरपंचायतीच्या सभापती पदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सा-यांना आहे.त्या दृष्टीने इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.











