
वैभववाडी : वैभववाडी शहरातील नागरिक व प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या “विश्रांती कट्टा” या सुविधेचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रविवारी (दि. २६ ऑक्टोबर) संपन्न झाले. शहरवासीयांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध झाली.
पालकमंत्री राणे यांच्या पुढाकारातून व वाभवे–वैभववाडी नगरपंचायतीच्या माध्यमातून दत्त मंदिराजवळ हा कट्टा उभारण्यात आला आहे.याच आज उद्घाटन झाले.या विश्रांती कट्ट्यामुळे शहरात येणाऱ्या प्रवाशांना व नागरिकांना थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी सुरक्षित व स्वच्छ जागा उपलब्ध झाली आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि लोकांसाठी उपयोगी ठरणारा हा कट्टा नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, दिगंबर पाटील, माजी उपनगराध्यक्ष संजय सावंत, नगरसेविका संगीता चव्हाण, तसेच बंड्या मांजरेकर, मंगेश लोके, प्रकाश पाटील, अंकित सावंत यांच्यासह नगरसेवक व शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.










