
वैभववाडी : महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंचा आज वाढदिवस आहे.त्यांच्या या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत.वैभववाडी येथील नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे यांनी मंत्री राणे यांच्या दिर्घायुष्यासाठी शहरातील दत्त मंदीर अभिषेक केला.श्री.राणे यांना दिर्घ आयुष्य लाभावे असे साकडे देवाकडे घातले.मागील वर्षी देखील श्री.रावराणे यांनी वाढदिवसाच्या दिवशी नितेश राणेंना मंत्री पद मिळावं म्हणून दत्त मंदीरात अभिषेक केला होता.