
वैभववाडी : करुळ घाटात दिंडवणेनजीक सकाळी कोसळलेली दरड हटविण्यात आली. तब्बल चार तासांनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. करुळ घाटात सकाळी १०..३० वा. दिंडवणेनजीक डोंगराच्या मातीचा ढीग रस्तावर आला होता. सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत माती व मलबा पसरला होता. त्यामुळे वाहतूक पुर्णतः ठप्प झाली होती. तीन जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवून दुपारी २.३० वाजता मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तब्बल चार तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली.