
वैभववाडी : रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्यावतीने जागतिक रक्तदाता दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १८जणांनी रक्तदान केले.यावेळी तालुक्यातील रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. येथील ग्रामीण रुग्णालयात जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन डॉ. अर्जुन एन नरोटे व रोटरीचे तालुकाध्यक्ष प्रशांत धनाजी गुळेकर यांच्या हस्ते झाले.या शिबीरात १८जणंनी रक्तदान केले.या दिनाच औचित्य साधून रक्तदान शिबिर राबविणा-या तालुक्यातील रोटरी क्लब ऑफ वैभववाडी, शिव शंभो प्रतिष्ठान करुळ, उंबर्डे ग्रामस्थ तरूण मंडळ उंबर्डे, वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ वैभववाडी, शिव प्रेरणा युवा मित्र मंडळ मुंबई (कुर्ली) , सुवर्ण सिंधू पंचगव्य चिकित्सा केंद्र मागवली, एकदंत फुड ॲण्ड वेव्हरेजिस गडमठ, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षण संघ वैभववाडी या संस्थांचा विशेष सन्मान करण्यात आला.तसेच ४२वेळा रक्तदान करणा-या प्रशांत गुळेकर यांना सन्मानपत्र सन्मानित करण्यात आलं.
यावेळी प्रशांत कुळये,सचिन रावराणे, शैलेंद्र परब , दिनकर केळकर , महेश संसारे , सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष राजेश पडवळ , महेश कदम ,कादर फरास,संजय गुरखे प्रशांत लाड, सुवर्णा संसारे , श्रीमती कांबळे , अनंत चव्हाण, मधुकर पाटील, अमोल दळवी यासह रक्तदाते उपस्थित होते.हे शिबीर यशस्वी होण्यासाठी कोल्हापूर जिवन धारा ब्लड बँकचे नयन मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.