खा. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत जिल्हा स्तरीय रस्सीखेच स्पर्धा

Edited by:
Published on: April 04, 2025 11:14 AM
views 62  views

वैभववाडी : माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे  खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी भाजपाच्या वतीने जिल्हा स्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले आहे. मंगळवार दि. ८ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वा. अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटांगणावर ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील  विजेत्या संघास १० हजार रुपये, व चषक, उपविजेत्या ७हजार रुपये व चषक, शिस्तबद्ध संघास २हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाजपच्या वतीने प्रत्येक खेळाडूला टी-शर्टच वाटप करण्यात येणार आहे.तसेच या स्पर्धेचे बक्षीस वितरण १० एप्रिल रोजी ओरोस येथील शरद कृषी भवन याठिकाणी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या स्पर्धेत इच्छुक संघांनी ५ एप्रिल पर्यंत नोंदणी करावयाची आहे. स्पर्धा विनामूल्य घेण्यात येणार आहे. तालुका व जिल्ह्यातील संघांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रितेश सुतार, अतुल सरवटे, रणजीत तावडे ,रोहन रावराणे यांच्याशी संपर्क साधावा.