
वैभववाडी : उ.बा.ठा चे शहरप्रमुख शिवाजी राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.
राणे यांच्या सोबतच सुधाकर आत्माराम शिर्के, सुहास राणे, धनंजय राणे, हर्षल मोरे, सुनील मोरे, समाधान रावराणे यांनी कमळ हाती घेतले.यावेळी कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत प्रमोद रावराणे, नासीर काझी, प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, अरविंदराव राणे, दिलीप रावराणे, अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे,यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.