
वैभववाडी : बारावी परीक्षेचा तालुक्याचा निकाल ९९.६९टक्के इतका लागला आहे.तालुक्यात प्रथम तीन क्रमांक कै.हेमंत केशव रावराणे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळविले. संपदा यशवंत पुजारी (वाणिज्य शाखा )९३.५०टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली. तर यांचं विद्यालयाची श्रेया देवजी पालकर(वाणिज्य शाखा) ९१.१७टक्के द्वितीय तर मानसी मुकुंद शिनगारे (विज्ञान शाखा)८६टक्के मिळवून तालुक्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला .या परीक्षेला तालुक्यातील तीन कनिष्ठ महाविद्यालयातुन ३२९विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी ३२८विद्यार्थी उत्तीर्ण झाले.