
वैभववाडी: तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारीच नाहीत.यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.तालुक्याच्या रुग्णालयाची ही अवस्था राजकीय अनास्थेमुळे झाली आहे.वैभववाडीकरांच्या नशीबी असलेले हे भोग केव्हा सुटणार हे देवच जाणे..
वैभववाडी तालुका ग्रामीण भाग असलेला तालुका आहे.आरोग्याची म्हणावी तशी सुविधा नाही.सरकारी आरोग्य यंत्रणेवरच बरचसं अवलंबून आहे.मात्र हीच यंत्रणा कोलमडली आहे.तालुक्याच ग्रामीण रुग्णालय सध्या व्हेंटिलेटरवर आहे.या रुग्णालयात सध्या कायमस्वरूपी डॉक्टर नाहीत.गेले चार दिवस डॉक्टर नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे.दि.१३फेब्रु.ला शहरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने केलेल्या आत्महत्येवेळी याठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने शवविच्छेदनासाठी मृतदेह कणकवली येथे न्यावा लागला.आठवडी बाजरादिवशी मोबाइल शाॅपीत झालेल्या चोरीतील चोरट्यांना वैद्यकीय तपासणीसाठी देखील कणकवली येथे न्यावे लागते.तालुका असून रुग्णालयाची अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य जनतेने काय करावे असा सवाल आता उपस्थित होत आहे.