
वैभववाडी : तालुक्यातील पंचायत समिती इमारतीचे उद्या (१५ ऑगस्ट) सकाळी ११ पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला खासदार नारायण राणे, आमदार निरंजन डावखरे, आम. ज्ञानेश्वर म्हात्रे, आम.दीपक केसरकर,आम निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ उदय पाटील, कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत, आदी उपस्थित राहणार आहेत. तालुकावासीयांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर यांनी केले आहे