वैभववाडीत मनोरंजनाची मेजवानी !

तीन दिवस रंगणार "वैभववाडी महोत्सव" ; रोटरी व न.पं.च आयोजन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 20, 2023 19:17 PM
views 359  views

वैभववाडी : रोटरी क्लब वैभववाडी आणि नगरपंचायत वाभवे-वैभववाडीचा "वैभववाडी महोत्सव" १२ जानेवारी ते १४ जानेवारी या कालावधीत होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातुन लोककला,संस्कृती आणि पंरपरा जपण्याचे काम केले जाणार असल्याची माहीती रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय रावराणे यांनी येथे दिली. येथील नगरपंचायत कार्यालयात श्री.रावराणे यांची पत्रकार परिषद झाली. 

या महोत्सवात कला, क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रस्सीखेच स्पर्धा, महिलांकरिता सौंदर्य स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांकरीता समुह नृत्य स्पर्धा होणार आहेत. जिल्ह्यातील लोक परंपरा व सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी उत्कृष्ट रंगमंच व्यवस्था आणि आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. तालुक्यातील लहान मोठ्या उद्योजकांना आपल्या उत्पादनाची जाहिरात व विक्री करण्यासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महोत्सवात विविध घरगुती, मालवणी, कोल्हापुरी, पंजाबी खाद्यपदार्थांची मांदियाळी असणार आहे. तालुकावासीयांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संजय रावराणे व नेहा माईणकर यांनी केले आहे. यावेळी नगराध्यक्ष नेहा माईणकर,उपनगराध्यक्ष संजय सावंत, बांधकाम सभापती विवेक रावराणे संतोष टक्के,  प्रशांत गुळेकर, विद्याधर सावंत आदी उपस्थित होते. यावर्षीचा महोत्सव तीन दिवस चालणार आहे.