अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी आपत्ती प्रशासन अलर्ट...!

तहसीलदार दिप्ती देसाई यांनी करूळ भट्टीवाडीतील डोंगर भागाची केली पहाणी : ग्रामस्थांशी साधला संवाद
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 20, 2023 19:34 PM
views 272  views

वैभववाडी : नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तहसीलदार दीप्ती देसाई यांनी करूळ भट्टीवाडी येथे जाऊन डोंगर भागाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार यांनी ग्रामस्थांना सूचना केल्या.

रायगड जिल्ह्यातील इर्शालवाडी परिसरातील डोंगराचा भाग घरांवर कोसळल्याने मोठी जिवीतहानी झाली आहे. खबरदारी म्हणून वैभववाडी तहसीलदार सौ. देसाई यांनी तालुक्यातील अनेक गावात जाऊन धोकादायक ठिकाणांची पहाणी केली.

करूळ भट्टीवाडीतील ग्रामस्थांशी तहसीलदार देसाई यांनी संवाद साधला. डोंगरा पासून वस्ती जवळ आहे. त्यामुळे डोंगराला कुठे भेगा गेल्या असतील, किंवा भूस्खलन होत असेल तर तात्काळ आपत्ती प्रशासनाला त्याची माहिती द्या. असे तहसीलदार देसाई यांनी ग्रामस्थांना सांगितले.

यावेळी नायब तहसीलदार श्री पाटील, सरपंच नरेंद्र कोलते,  विवेक कदम, सह्याद्री जीव रक्षक चे हेमंत पाटील, प्रकाश सावंत, राजेंद्र कदम, विजय सावंत, राजेंद्र वारंग, तलाठी सुदर्शन पाटील, कोतवाल रत्नकांत राशीवटे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्ताराम कदम, दौलत जिनगरे, नारायण कदम, अनिल जिनगरे, श्रीधर मोरे, पांडुरंग केगडे, सुरेश जिनगरे, जगन्नाथ चव्हाण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डोंगर भागाची व घरांची तहसीलदार यांनी पाहणी केली.