वैभववाडी भाजपाकडून नाधवडे महादेव मंदिरात दुग्धाभिषेक

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या महाकाल मंदीर सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्याचे औचित्य
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 12, 2022 14:52 PM
views 558  views

वैभववाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्जैन येथे केलेल्या महाकाल मंदीरातील सुशोभीकरण  कामाच्या लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून वैभववाडी भाजपच्यावतीने नाधवडे येथे  स्वयंभू महादेव देवालयामध्ये अभिषेक करण्यात आला.भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंदीरामध्ये शंकराची पूजा, अभिषेक व आरती केली.

देशात असलेल्या १२ ज्योतीर्लीगांपैकी उज्जैन येथे असलेल्या महाकाल मंदीराचे सुशोभीकरण करण्यात आले. त्याचा लोकार्पण सोहळा मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या सोहळ्याचे औचित्य साधून भाजपाच्यावतीने नाधवडेत महादेव मंदिरात अभिषेक करण्यात आला.

यावेळी  भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा कार्यकारणी सदस्य  राजेंद्र राणे, माजी सभापती अक्षता डाफळे, माजी जि प सदस्य सुधीर नकाशे, महिला तालुकाप्रमुख प्राची तावडे, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, तालुकासोशल मीडिया प्रमुख बाबा कोकाटे ,माजी तालुका अध्यक्ष सुहास  सावंत, महेश गोखले ,शक्ति केंद्रप्रमुख प्रदीप नारकर, कोकीसरे सरपंच अवधूत नारकर  ,नाधवडे सरपंच सुर्यकांत कांबळे, बांधवाडी बुथ प्रमुख बाबू भिसे ,नंदकुमार  आम्रसकर ,प्रकाश परबते नाधवडे ग्रामपंचायत सदस्य गोपाळ कोकाटे ,लीना पांचाळ, शैलेजा पांचाळ ,आनंद नेवरेकर ,संजय पेडणेकर, प्रसन्न पेडणेकर, मिलिंद ठाकूर व कार्यकर्ते उपस्थित होते