
वैभववाडी : नैराश्यातुन तणनाशक प्राशन केलेल्या वैभववाडीतील तरुण व्यापारी समीर शांताराम माईणकर (वय-३८)यांचा आज (ता.१५)पहाटे चार वाजण्याच्या सुमारास निधन झाले.त्याच्यावर कणकवली येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते.
वैभववाडी शहरात समीर याच्या मालकीचे दत्तसमीर जनरल स्टोअर्स आहे. गेल्या चार पाच दिवसांपासुन त्याचे मानसिक संतुलन ढासळले होते.शुक्रवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास त्याने घरातच तणनाशक प्राशन केले.ही माहीती घरातील नातेवाईकांना समजताच त्याला तातडीने ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे त्याच्यावर प्राथमीक उपचार करून अधिक उपचाराकरीता कणकवली येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे उपचार सुरू असताना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याचे निधन झाले.आज दुपारी माईणकरवाडी येथील स्मशानभुमीत त्याच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले.समीर हा उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू म्हणुन तालुक्यात प्रसिध्द होता. त्याच्या पश्यात पत्नी, दोन मुलगे, आई, वडील, भाऊ, वहिनी, बहिणी असा मोठा परिवार आहे.










