
वैभववाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा तालुक्याचा निकाल १०० टक्के लागला आहे. आचिर्णे कनिष्ठ महाविद्यालयाची निरजा प्रदीप मांजरेकर (८६.१७ टक्के)ही तालुक्यात प्रथम आली आहे.कै.हेमंत केशव रावराणे विद्यालयाचे प्रफुल्ल प्रवीण मोरे (८५.६७ टक्के)व्दितीय तर शुभम दिलीप परब (८४.५० टक्के)हा तालुक्यात तृतीय क्रमांकाने उतीर्ण झाला आहे.तालुक्यातील ३१ विद्यार्थी विशेष श्रेणीत उतीर्ण झाले आहेत.