
वैभववाडी : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ ग्रामीण व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. हा हल्ला निंदनीय आहे.तसेच हल्लेखोर वकील राकेश किशोर यांच्यावर कडक कारवाई करावी. अशी मागणी तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींकडे करण्यात आली.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर न्यायालयात नुकताच हल्ला झाला.हा प्रकार अतिशय निंदनीय आहे.या घटनेतील हल्लेखोरावर कडक कारवाई करावी.अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष भास्कर जाधव,महिला मंडळ अध्यक्ष शारदा कांबळे, रविंद्र पवार,उपाध्यक्ष संतोष कदम, राजेंद्र कांबळे, सहसचिव शरद कांबळे, दिलीप यादव, सुहास जाधव, स्नेहा जाधव,नवेली जाधव, जोत्स्ना जाधव,वैष्णवी जाधव, मंगेश कांबळे, अर्जुन कदम, सुमन कदम,उर्मिला जाधव,संजीवनी जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.










