
वैभववाडी : उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी ही कारवाई केली.श्री.लोके यांच्या हकालपट्टीनंतर तालुका प्रमुख पदी नंदु शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
लोके हे गेली अनेक वर्षे शिवसेनेचे तालुकाप्रमुख म्हणून काम करीत होते. मात्र, पक्षविरोधी काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्याजागी नंदु शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. लोके हे भाजपात प्रवेश करणार असल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचेही बोलले जात आहे.










