
वैभववाडी : तालुक्यात उबाठाला मोठा धक्का बसणार आहे.तालुक्याचा प्रमुख पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडणार आहे. मुंबई येथे भाजपात प्रवेश करणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर उबाठाला गळती लागली आहे.दोन्ही निवडणुकीत कोकणात झालेल्या दारुण पराभवानंतर अनेक पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडत आहेत.उबाठाची पडझड अद्याप थांबत नाही.दसरा मेळाव्यात माजी आमदार राजन तेली यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केल्यानंतर दुसरा धक्का वैभववाडीत बसणार आहे.
वैभवाडी तालुक्यातील एका मोठा पदाधिकारी ४ऑक्टोबरला भाजपात प्रवेश करणार आहे.मुंबई येथे हा पक्ष प्रवेश होणार आहे.त्यासाठी तो पदाधिकारी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह दाखल झाला आहे.हा पदाधिकारी गेली अनेक वर्षे शिवसेनेत प्रमुख भूमिका बजावत आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे तालुक्यात उबाठासाठी मोठा धक्का असणार आहे.










