नेर्लेतील नवरात्र उत्सवाची १ ऑक्टोबरला सांगता

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 26, 2025 14:08 PM
views 274  views

वैभववाडी : तालुक्यातील नेर्ले येथील श्री भैरी भवानी मंदिरातील नवरात्र उत्सवाचा सांगता समारंभ १ऑक्टोबरला होणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

येथील श्री भैरी भवानी मंदिरात घटस्थापनेपासून नवरात्र उत्सव उत्साहात साजरा होत आहे. या उत्सवाची सांगता बुधवार दि‌. १ ऑक्टोबरला होणार आहे. यानिमित्ताने या दिवशी सकाळी देवीची आरती, नवग्रह पुजन, होम हवन, दुपारी - बलिदान, नवस बोलणे - फेडणे, जोगवा फेडणे, रात्री महाप्रसाद, घटनपुजन, दिवट्या नाचवणे आदी कार्यक्रम होणार आहेत. उत्तर पुजा व काकड आरतीने या समारंभाची सांगता होणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन जयभवानी मंडळ नेर्ले व श्री बाळासाहेब खानविलकर (इनामदार) यांनी केले आहे.