
वैभववाडी : तालुक्यातील नापणे धबधबा येथे कोकण विभागीय आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी हे मंगळवार (दि.५)भेट देणार आहेत.धबधब्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या काचेच्या पुलाची पाहणी करणार आहेत.यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अनिल पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
नापणे धबधबा येथे सिंधू रत्न योजनेतून ९९लाख ६३हजार रुपये खर्चून राज्यातील पहीला काचेचा पुल बांधण्यात आला.हा काचेचा पुल पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक पर्यटक याठिकाणी येऊ लागले आहेत.पर्यटनदृष्ट्या हे ठिकाण विकसित होऊ लागले आहे.याठिकाणी अधिकच्या काही सेवा सुविधा कशा पद्धतीने देता येतील याचा दृष्टीने विभागीय आयुक्तांचा हा दौरा असणार आहे.ते या संपूर्ण परिसराची पाहणी करणार आहेत.